Anuradha Vipat
सकाळच्या नाश्त्यासाठी शेवयांचा उपमा हा एक झटपट होणारा आणि चविष्ट पर्याय आहे.
शेवया, कांदा , मटार, मिरची , तेल किंवा तूप, मोहरी,जिरे, कढीपत्त्याची पाने, हिरव्या मिरच्या , आल्याचा छोटा तुकडा , मीठ, अर्धा चमचा साखर , लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओले खोबरे.
कढईत थोडे तूप टाकून शेवया तांबूस होईपर्यंत भाजून घ्या. मोठ्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवा. त्यात थोडे मीठ आणि भाजलेल्या शेवया टाका. २-३ मिनिटांत शेवया मऊ झाल्या की चाळणीत काढून घ्या .
कढईत तेल गरम करुन त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या टाकून फोडणी द्या. त्यानंतर त्यात चिरलेला कांदा घालून परता. कांदा मऊ झाला की त्यात गाजर, मटार आणि शिमला मिरची टाका.
शिजवलेल्या शेवया कढईत घाला. चवीनुसार मीठ आणि थोडी साखर घालून सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करा.
कढईवर २ मिनिटे झाकण ठेवून मंद आचेवर वाफ काढा.
गॅस बंद केल्यावर त्यावर लिंबाचा रस, ताजी कोथिंबीर आणि ओले खोबरे घालून गरमागरम सर्व्ह करा.