Anuradha Vipat
मन वारंवार कमजोर होणे किंवा सतत नकारात्मक विचार येणे यामागे मानसिक, शारीरिक आणि जीवनशैलीशी संबंधित अनेक कारणे असू शकतात.
जेव्हा तुमची ७-८ तासांची झोप पूर्ण होत नाही, तेव्हा मेंदूला विश्रांती मिळत नाही. यामुळे चिडचिड वाढते आणि मन कमजोरी होतं.
सोशल मीडियावर इतरांचे आनंदी फोटो पाहून स्वतःच्या आयुष्याशी तुलना करणे हे मन कमजोर होण्याचे मोठे कारण आहे.
शरीरात व्हिटॅमिन डी आणि बी-१२ ची कमतरता असल्यास नैराश्य, चिंता आणि मानसिक कमजोरी जाणवू शकते.
जुन्या अपयशाचा किंवा दुखाचा सतत विचार करत राहिल्याने मन स्थिर राहू शकत नाही.
एखाद्या लहान गोष्टीचा खूप मोठा विचार केल्याने मन भीती आणि चिंतेने ग्रासले जाते.
तुमच्या भावना कोणाशीही शेअर न केल्याने मनावरची ओढाताण वाढते.