Anuradha Vipat
तुमचा आत्मविश्वास ही तुमची सर्वात मोठी ताकद असते, परंतु आपल्या काही सवयींमुळे तो कळत-नकळत कमी होत जातो.
इतरांशी तुलना केल्याने आपण स्वतःच्या गुणांकडे दुर्लक्ष करतो ज्यामुळे आत्मविश्वास कमी होतो.
अपयश ही शिकण्याची एक पायरी आहे. त्याला शेवट मानणे ही मोठी चूक आहे.
मला हे जमणार नाही अशी वाक्ये वारंवार स्वतःला म्हणाल्यास तुमचा मेंदू तसाच विचार करू लागतो.
जेव्हा गोष्टी मनासारख्या होत नाहीत, तेव्हा आत्मविश्वास डळमळीत होतो. परिपूर्णतेपेक्षा 'प्रगती' महत्त्वाची आहे.
झालेल्या चुकांतून शिकण्याऐवजी सतत त्यांचाच विचार करत राहिल्याने आत्मविश्वास आपोआप कमी होतो.
प्रत्येक निर्णयासाठी दुसऱ्यांच्या होकाराची किंवा कौतुकाची वाट पाहू नका.