Anuradha Vipat
वाढत्या धावपळीच्या जगात मानसिक तणाव ही गंभीर समस्या बाब होत आहे. महिलांमध्ये तर मानसिक तणाव झपाट्याने वाढत आहे.
सामाजिक आणि भावनिक कारणांमुळे महिलांमध्ये तणावाची लक्षणे अधिक दिसतात.
महिलांमध्ये हार्मोनल चढउतारामुळे मूड आणि तणावाच्या पातळीत बदल होतो.
महिलांवर घरगुती कामे आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या अधिक असतात त्यामुळे त्यांच्यावर मानसिक ताण येतो.
महिलांमध्ये नैराश्य, चिंता आणि पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर यांमुळे मानसिक तणाव येतो आहे
गर्भधारणेदरम्यान तणावामुळे अकाली जन्म आणि कमी वजनाच्या बाळासारख्या समस्या निर्माण होतात.
तणावामुळे आणि नैराश्यामुळे महिलांच्या हृदयावर जास्त परिणाम होतो