Anuradha Vipat
मासिक पाळी किंवा पिरियड्स हे महिलांच्या आरोग्याचा आरसा असतात.
पाळीचा रंग, कालावधी आणि त्यातील बदल तुमच्या शरीरातील अंतर्गत आरोग्याबद्दल खूप काही सांगतात.
हे निरोगी आणि ताज्या रक्ताचे लक्षण आहे. तुमची पाळी सामान्य आहे.
शरीरात इस्ट्रोजेन संप्रेरकाची पातळी कमी असल्याचे हे लक्षण असू शकते किंवा अति व्यायामामुळे असे होऊ शकते.
हे सहसा जुने रक्त असते जे शरीराबाहेर पडायला वेळ लागला आहे. पाळीच्या सुरुवातीला किंवा शेवटी हे होणे सामान्य आहे.
जर रक्ताचा रंग राखाडी असेल, तर ते इन्फेक्शन किंवा गर्भपाताचे लक्षण असू शकते. अशा वेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
जर पाळी सतत अनियमित असेल, तर ते PCOS/PCOD, थायरईड किंवा अति तणावाचे संकेत असू शकतात .