Mahesh Gaikwad
मासिक पाळी ही स्त्रियांमधील नैसर्गिक प्रक्रिया आहे. मासिक पाळीचा काळ महिलांसाठी शारीरिक आणि मानसिकदृट्या आव्हानात्मक असतो.
मासिक पाळी दरम्यान महिलांना पोटदुखी, डोकेदुखी आणि अतिरक्तस्त्राव होणे, या समस्यांचा त्रास होतो.
बऱ्याच महिला मासिक पाळी दरम्यान न कळत काही चुका करतात. ज्यामुळे या काळात आरोग्याच्या समस्या उद्भवतात.
या काळात महिलांमध्ये होणारे हार्मोनल बदल टाळण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी गरजेचे असते. मासिक पाळीमध्ये महिला कमी पाणी पितात, ज्यामुळे थकवा, डोकेदुखी होते.
मासिक पाळीमध्ये महिलांना व्यायाम करणे टाळले पाहिजे. पाळीमध्ये विश्रांती आवश्यक असली, तरी सौम्य स्ट्रेचिंग, योगा किंवा चालणे यामुळे वेदना कमी होतात.
पाळीमध्ये महिलांना गोड खाण्याची इच्छा होते. परिणामी जास्त साखर, फास्ट फूड खाल्ले जाते, पण यामुळे शरीरातील सूज वाढू शकते. याऐवजी हलका, पौष्टिक आहार घ्यावा.
पाळीमध्ये रात्री अपुरी झोप, मोबाईलचा अति वापर यामुळे शरीर थकते. या काळात शरीराला विश्रांती गरज असते. त्यामुळे कमीत कमी ७-८ तास झोप घ्या.
पाळी हा लाजेचा विषय नसून पाळीबाबत गैरसमज दूर करून जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. पाळीबाबत समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे.