Anuradha Vipat
दिवाळी सणात केवळ महिलाच नाही, तर पुरुषांमध्येही पारंपारिक कपड्यांची मोठी क्रेझ पाहायला मिळते.
यंदाच्या दिवाळीत पुरुषांसाठी फॅशन विश्वात कम्फर्ट आणि रॉयल लुकचा उत्तम मेळ पाहायला मिळत आहे.
लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीजेच्या निमित्ताने पुरुषांना एकदम हँडसम आणि क्लासी लुक देण्यासाठी खालील ट्रेंड्स सर्वोत्तम ठरतील.
हा लुक सध्या पुरुषांच्या फॅशनमध्ये टॉपवर आहे. साध्या कुर्त्यावर हेवी वर्क किंवा फ्लोरल एम्ब्रॉयडरी असलेले नेहरू जॅकेट घातल्याने लुक अतिशय रॉयल दिसतो.
चिकनकारी कुर्ते नेहमीच क्लासिक आणि कम्फर्टेबल असतात. यंदा फेस्टिव्ह सीझनसाठी पेस्टल रंगांच्या चिकनकारी कुर्त्यांना तरुण मुलांची पहिली पसंती मिळत आहे.
जर तुम्हाला संपूर्ण पारंपारिक आणि मराठमोळा किंवा इंडो-वेस्टर्न लुक हवा असेल, तर धोती-कुर्ता हा एक उत्तम पर्याय आहे.
ज्या तरुणांना नेहमीचा पायजमा घालायचा नाही, त्यांच्यासाठी सिमेट्रिकल किंवा अस्सिमेट्रिकल कुर्ता आणि स्ट्रेट कट पॅंटचा ट्रेंड इन आहे.