Diwali Padwa Saree Styles : दिवाळी पाडव्यासाठी खास साडी नेसण्याच्या ५ स्टाईल्स; यंदा पाडव्याला दिसा सर्वात सुंदर!

Anuradha Vipat

अतिशय शुभ मुहूर्त

दिवाळी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक अतिशय शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी पती-पत्नीच्या नात्याला उजाळा दिला जातो .

Diwali Padwa Saree Styles | agrowon

स्टाईल्स

यंदाच्या दिवाळी पाडव्याला जर तुम्हाला पारंपरिक लुकसोबतच मॉडर्न आणि स्टायलिश दिसायचे असेल, तर साडी नेसण्याच्या या सर्वात लोकप्रिय स्टाईल्स नक्की ट्राय करा.

Diwali Padwa Saree Styles | agrowon

नऊवारी स्टाईल

काठपदराच्या पैठणी किंवा सिल्क साडीपासून मस्तानी किंवा पेशवाई कासोटा स्टाईल नऊवारी साडी नेसा. या स्टाईलमध्ये साडीचा घेर आणि काठ खूप रॉयल दिसतात.

Diwali Padwa Saree Styles | agrowon

बॉलिवूड स्टाईल फ्लोईंग ड्रेप

जर तुम्ही टिश्यू सिल्क, ऑर्गेन्झा किंवा जॉर्जेट साडी नेसणार असाल, तर ही स्टाईल अतिशय ग्लॅमरस दिसते.

Diwali Padwa Saree Styles | Agrowon

बेल्टेड किंवा कमरपट्टा स्टाईल

साडी नेहमीप्रमाणे नेसून पदर डाव्या खांद्यावर व्यवस्थित पिनअप करा. त्यानंतर कंबरेवर साडीला मॅचिंग असणारा एम्ब्रॉयडरी केलेला फॅब्रिक बेल्ट लावा.

Diwali Padwa Saree Styles | agrowon

बंगाली किंवा ओढणी टाईप ड्रेप

यात साडीचा पदर मागून पुढे आणला जातो. पदर उजव्या खांद्यावरून पुढे आणून त्याचा एक कोपरा डाव्या बाजूला कंबरेत खोचला जातो.

Diwali Padwa Saree Styles | agrowon

लेहेंगा स्टाईल ड्रेपिंग

साडी खोचताना संपूर्ण कंबरेभोवती लहान-लहान निरण्या गोल आकारात खोचा, ज्यामुळे साडीला लेहेंग्यासारखा घेर येतो. त्यानंतर पदर व्ही-शेप मध्ये पुढे काढा.

Diwali Padwa Saree Styles | agrowon

Diwali Outfits 2026 : यंदा ट्रेंडमध्ये असणारे ५ पारंपारिक लुक्स; दिवाळी सणांत दिसा सर्वात हटके!

Diwali Outfits 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...