Menopause Symptoms : मेनोपॉज दरम्यान होणारे शारीरिक बदल आणि उपाय

Anuradha Vipat

प्रमाण

मेनोपॉज दरम्यान शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होते.

Menopause Symptoms | agrowon

शारीरिक बदल

मेनोपॉजमुळे महिलांच्या शरीरात अचानक उष्णता जाणवणे, वजन वाढणे आणि हाडे ठिसूळ होणे यांसारखे मोठे शारीरिक बदल होतात.

Menopause Symptoms | agrowon

रजोनिवृत्ती

सलग १२ महिने मासिक पाळी न आल्यास रजोनिवृत्ती झाली असे मानले जाते.

Menopause Symptoms | agrowon

नैसर्गिक टप्पा

मेनोपॉज प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक नैसर्गिक टप्पा आहे, जो सामान्यतः ४५ ते ५५ वयोगटात येतो.

Menopause Symptoms | agrowon

पोटाभोवती चरबी

मेनोपॉजमध्ये इस्ट्रोजेनच्या कमतरतेमुळे शरीराची चयापचय क्रिया संथ होते. यामुळे पोटाच्या भागावर चरबी साठू लागते.

Menopause Symptoms | agrowon

योनीमार्गात कोरडेपणा

हॉर्मोन्स कमी झाल्यामुळे योनीमार्गातील ओलावा कमी होतो आणि तिथली त्वचा पातळ होते.

Menopause Symptoms | agrowon

त्वचा आणि केस

शरीरातील कोलाजेन कमी झाल्यामुळे त्वचा कमालीची कोरडी पडते, सुरकुत्या येतात आणि केस खूप पातळ होऊन गळू लागतात.

Menopause Symptoms | Agrowon

Folic Acid Benefits : महिलांच्या आरोग्यासाठी फॉलिक अ‍ॅसिडचे महत्त्व

Folic Acid Benefits | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...