Anuradha Vipat
औषध घेताना केलेली एक छोटीशी चूक जीवावर बेतू शकते.
औषध विकत घेताना आणि सेवन करताना खालील ५ महत्त्वाच्या गोष्टी नेहमी तपासाव्यात.
सर्वात आधी औषधाच्या पाकिटावरची अंतिम तारीख तपासा.
औषध तेच आहे का जे डॉक्टरांनी लिहून दिले आहे? अनेकदा नावात साम्य असल्यामुळे मेडिकल स्टोअरमध्ये चुकीचे औषध दिले जाऊ शकते.
काही औषधे 'रिकाम्या पोटी' घ्यायची असतात तर काही 'जेवणानंतर'. औषध पाण्यासोबत घ्यायचे आहे की दुधासोबत, हे तपासा.
औषधाचे पाकीट किंवा बाटली कुठेही फुटलेली किंवा फाटलेली नसावी.
जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट औषधाची ॲलर्जी असेल, तर औषध घेण्यापूर्वी त्यातील घटक तपासा किंवा फार्मसिस्टला विचारा.