Anuradha Vipat
पगार झाला की आनंदाच्या भरात आपण अनेकदा बेजबाबदारपणे खर्च करतो.
आर्थिक स्थैर्यासाठी पगाराच्या दिवशी 'ही' १ मोठी चूक टाळणे अत्यंत आवश्यक आहे
अनेक लोक पगार झाल्यावर आधी मॉलमध्ये फिरणे, बाहेर जेवणे किंवा ऑनलाईन शॉपिंग करतात .
पगार खात्यात जमा झाल्यावर सर्वात आधी 'स्वतःला पैसे द्या' म्हणजेच खर्चाला सुरुवात करण्यापूर्वी किमान १०% ते २०% रक्कम एका वेगळ्या बचत खात्यात किंवा गुंतवणुकीत वळती करा .
पगार झाला आहे या मानसिकतेतून क्रेडिट कार्डवरून मोठ्या वस्तूंची खरेदी करू नका.
महिनाभराच्या फिक्स्ड खर्चाची यादी न करता पैसे खर्च केल्यास महिना अखेरीस आर्थिक चणचण भासते.
अचानक येणाऱ्या संकटांसाठी तुमच्या पगारातील एक छोटा हिस्सा दरमहा बाजूला काढायला विसरू नका.