Anuradha Vipat
घरगुती मसाल्यांचे अनेक औषधी उपयोग आहेत. ते केवळ अन्नाला चव आणि सुगंधच देत नाहीत तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत.
हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचे संयुग असते, जे जखमा लवकर भरून काढण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास उपयुक्त आहे.
लसणामध्ये ऍलिसिन नावाचे संयुग असते रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त आहे.
धणे मूत्रपिंडाचे कार्य सुधारण्यास आणि रक्तदाब कमी करण्यास उपयुक्त आहे.
मेथी मधुमेहासाठी उपयुक्त आहे आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
वेलचीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत आणि ती श्वासाची दुर्गंधी कमी करण्यास मदत करते.
जिरं पचनास मदत करते आणि शरीरातील वात कमी करण्यास उपयुक्त आहे.