Animal Heat Stress : जनावरांतील उष्णतेचा ताण कमी करण्याचे उपाय

Team Agrowon

जनावरांना जास्तीत जास्त सावली पुरवावी. उन्हाळ्यात जनावरांना गोठ्यात बसण्यासाठी सरासरीपेक्षा जास्त जागा द्यावी. एकाच जागेवर जास्त गर्दी असल्यास उष्णतेचे निस्सारण होण्यास वेळ लागतो.

Animal Heat Stress | Agrowon

गोठ्याच्या आजूबाजून झाडे लावावीत. आपला गोठा हवेशीर असावा.

Animal Heat Stress | Agrowon

ताण सहन करण्यासाठी शरीरातील बिघडलेला क्षारांचा समतोल साधण्यासाठी योग्य प्रमाणात क्षार मिश्रण द्यावे.

Animal Heat Stress | Agrowon

जनावरांना जास्त चावावा लागणारा चारा ज्या वेळी उन्हाचा तडाखा असेल अशा वेळेस देऊ नये. कारण असा चारा चावण्यासाठी जनावराच्या शरीरात अतिरिक्त उष्णता तयार होते.

Animal Heat Stress | Agrowon

छताची उंची जास्त असावी. छताच्या पत्र्याला पांढरा रंग दिला तर उष्णतेचे परावर्तन होऊन जनावरांना उष्णतेचा त्रास कमी होतो.

Animal Heat Stress | Agrowon

मुक्त संचार गोठ्यामध्ये जनावरांना जास्तीत जास्त वेळ पाणी पिण्यास उपलब्ध असावे.

Animal Heat Stress | Agrowon

उन्हाळ्याच्या कालावधीत छतावर स्पिंकलर्स लावल्याने तापमान नियंत्रणात राहते. छतावर पालापाचोळा किंवा पाचट टाकल्यास उष्णतेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

Animal Heat Stress | Agrowon