Guava Orchard Management : वाढत्या उन्हात पेरु बागेत करायचे उपाय

Team Agrowon

सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून उष्णतेच्या लाटा आहेत. तीव्र सूर्यप्रकाश व वाढलेल्या तापमानामुळे आंबे बहरातील फळांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

Guava Orchard Management | Agrowon

वाढलेले तापमान, पाणी कमतरतेमुळे पेरु बागेत फूलगळ, फळगळ दिसून येते.

Guava Orchard Management | Agrowon

झाडावरील काळी पडलेली, वाळलेली फळे काढून तसेच झाडाखाली गळून पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत.

Guava Orchard Management | Agrowon

जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी आच्छादनाचा वापर करावा.

Guava Orchard Management | Agrowon

बाष्पीभवनाचा वेग कमी करण्यासाठी केओलिन ८ टक्के द्रावणाची फवारणी करावी.

Guava Orchard Management | Agrowon

दुष्काळी परिस्थितीत झाडे तग धरून राहण्यासाठी १ टक्के पोटॅशिअमची फवारणी करावी. तसेच हलकी छाटणी करून झाडाचा आकार मर्यादित ठेवावा.

Guava Orchard Management | Agrowon

सिंचनासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. शक्यतो सकाळी पाणी द्यावे. फळमाशीच्या नियंत्रणासाठी प्रति हेक्टरी १० कामगंध सापळे लावावेत.

Guava Orchard Management | Agrowon