Anuradha Vipat
गोवर आणि कांजण्या हे दोन्ही अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहेत.
हे आजार प्रामुख्याने लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतात, परंतु ते कोणत्याही वयात होऊ शकतात.
या दोन्ही आजारांमध्ये रुग्णाला शरीरावर पुरळ येणे, ताप आणि अशक्तपणा जाणवतो.
रुग्णाला घरातील इतर सदस्यांपासून, विशेषतः ज्यांचे लसीकरण झालेले नाही, गरोदर महिला आणि लहान मुलांपासून वेगळ्या हवेशीर खोलीत ठेवा.
पुरळ आल्यापासून किमान ४ ते ५ दिवस रुग्णाला पूर्णपणे वेगळे ठेवावे.
जोपर्यंत शरीरावरील सर्व फोड सुकून त्यावर खपली धरत नाही, तोपर्यंत रुग्णाला विलीगीकरणात ठेवावे.
रुग्णाच्या शरीराची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते, त्यामुळे त्यांना पुरेशी झोप आणि पूर्ण विश्रांती मिळू द्या.