Deepak Bhandigare
मटका सिंचन म्हणजे मातीचे मडके जमिनीत पुरून त्यातून हळूहळू पाणी झिरपू देण्याची पारंपरिक पद्धत.
या पद्धतीत पाणी थेट मुळांपर्यंत पोहोचते आणि दीर्घकाळ ओलावा टिकून राहतो
मटका सिंचनाची पद्धत प्रामुख्याने कमी पाण्याच्या भागात बागायती पिकांसाठी वापरली जाते
पिकांना पाणी देण्याची आणखी एक पद्धत तुषार सिंचन असून, यात अतिशय सूक्ष्म थेंबांच्या स्वरुपात पाणी पिकांवर फवारले जातेAgrowon
तुषार सिंचनामुळे पाण्याचा अपव्यय कमी होऊन पिकांना आवश्यक तेवढाच ओलावा मिळतो
फवारा सिंचन ही अशी एक पद्धत आहे ज्यात पाणी फवाऱ्याद्वारे हवेतू उडवून पिकांवर टाकले जाते
भाजीपाला आणि गवतासाठी ही पद्धत उपयुक्त मानली जाते
ठिबक सिंचन ही पिकांच्या मुळाशी थेंबाथेंबाने पाणी देण्याची पद्धत असून, यामुळे पाण्याची बचत होते