Aslam Abdul Shanedivan
पावसाळ्यात आपल्याला आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. कारण बदल्या हवामानाचा आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
अशा वेळी हिरव्या पालेभाज्यांसह फळांचे सेवन शरीराला पोषक देण्यासाठी फायदेशीर ठरतात.
तर पालेभाज्यामध्ये सर्वोत्तम ठरते ती लाल, हिरवी माठाची पालेभाजी. माठाची पालेभाजी आरोग्यदायी अनेक फायदे देणारी आहे.
माठाची पालेभाजी जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असते. यात व्हिटॅमिन ए, सी, के आणि फोलेटसारखे आवश्यक पोषक घटक असतात.
तर माठातील जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.
तसेच माठाची पालेभाजी पचनसंस्थेला निरोगी ठेवण्याचे काम करते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि आतड्यांना आराम मिळतो
तर माठाची पालेभाजी व्हिटॅमिन सीने समृद्ध असल्याने ती डोळ्यांचे आरोग्य सुधारते आणि पेशींची वाढ करण्यास मदत करते.