Anuradha Vipat
हॉटेलसारखा सुवासिक, मऊ आणि सुटसुटीत मटार पुलाव घरच्या घरी बनवण्याची रेसिपी आणि सोप्या टिप्स खालीलप्रमाणे आहेत.
लांब दाण्यांचा बासमती तांदूळ, ताजे हिरवे मटार, शहाजिरे, तमालपत्र, तुकडा दालचिनी, लवंगा, काळी मिरी, हिरवी वेलची, कांदा , आले-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, काजू, तूप किंवा तेल, चवीनुसार मीठ, लिंबाचा रस.
बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर तो २५ ते ३० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. यामुळे भाताचा दाणा लांबसडक आणि मऊ शिजतो.
कढईत किंवा कुकरमध्ये तूप गरम करा. त्यात काजू परता. तुपात शहाजिरे आणि सर्व खडे मसाले टाका. मसाल्यांचा सुगंध सुटेपर्यंत काही सेकंद परता. फोडणीत उभा चिरलेला कांदा घालून तो हलका गुलाबी होईपर्यंत परता. त्यानंतर आले-लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे घाला. आता ताजे मटार टाकून मध्यम आचेवर २ मिनिटे चांगले परतून घ्या.
कोमट किंवा उकळते पाणी कढईत टाका. चवीनुसार मीठ आणि भात पांढरशुभ्र व सुटसुटीत होण्यासाठी २-३ थेंब लिंबाचा रस घाला.
पाण्याला उकळी आल्यावर भिजवलेला तांदूळ कढईत टाका. पाणी थोडे आटल्यावर गॅस अगदी मंद करा आणि कढईवर घट्ट झाकण ठेवून १० ते १२ मिनिटे वाफेवर भात शिजू द्या.
गॅस बंद केल्यावर लगेच झाकण उघडू नका. ५ मिनिटे वाफेमध्येच पुलाव सेट होऊ द्या. शेवटी वरून तळलेले काजू आणि कोथिंबीर पसरवून गरमागरम मटार पुलाव रायत्यासोबत सर्व्ह करा.