sandeep Shirguppe
त्वचा सुंदर बनवण्यापासून ते जखम बरी करण्यासाठी नारळाचे तेल सक्षम आहे असे सांगितले जाते.
नवजात बाळाला नारळाच्या तेलाने मालिश करणे शरीरासाठी चांगले आहे हे तेल मॉइश्चरायझर म्हणून काम करते.
जर तुमच्या टाचांना तडे गेले असतील तर खोबरेल तेल त्यांना बरे करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.
खोबरेल तेलातील दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म त्यांना बरे करण्यास मदत करतात.
नारळ तेल एक उत्तम मेकअप रिमूव्हर म्हणून काम करते. कापसाचा वापर करुन तुम्ही तुमचा मेकअप काढू शकता.
गर्भधारणेनंतर स्ट्रेच मार्क्स काढण्यासाठी खोबरेल तेल हा सर्वोत्तम पर्याय आहे.
कोरडी त्वचा बरी करण्यासाठी हे उपयुक्त आहे. यापासून तुम्ही घरच्या घरी लिप बामही तयार करुन त्याचा वापर करु शकता.