sandeep Shirguppe
शेवग्याच्या शेंगांसोबत त्यांच्या पानांचेही आरोग्याला अनेक फायदे आहेत. शेवग्याच्या पानांना आयुर्वेदिय महत्वही आहे.
या पानांमध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
हाडांना मजबुती, मेंदूचे आरोग्य शरीरातील दाह कमी करण्यासाठी शेवग्याचा पानांचा फायदा होतो.
झिंकचे प्रमाण असल्यामुळे केस गळती थांबून केसांच्या वाढीस मदत होते.
जीवनसत्व अ, क आणि इ चे प्रमाण भरपूर असल्यामुळे त्वचा निरोगी राहाते, त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यास मदत होते.
कॉलेस्ट्रोल कमी करून रक्त गोठण्यापासून ते मानसिक ताणताणाव कमी करण्यासाठी शेवगा पावडर उपयुक्त आहे.
अँटिऑक्सिडेंटस भरपूर असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि कॅन्सरच्या वाढीस देखील अटकाव करते.
शेवगा पावडर जीवनसत्व क युक्त असल्यामुळे पचन शक्ती सुधारते. यामध्ये जिवनसत्व अ असल्याने डोळ्यांना फायदा होतो.
शेवगा पावडर आहारात वापरण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा