Anuradha Vipat
मार्गशीर्ष महिना हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्याचे आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व आहे.
मार्गशीर्ष महिन्यात दररोज सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे. यामुळे सर्व पापांचा नाश होतो.
मार्गशीर्ष या महिन्यात दररोज भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाच्या मूर्तीला किंवा फोटोला तुळशीची पाने अर्पण करून पूजा करावी.
मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते. या दिवशी देवीची स्थापना करून पूजा, कथा वाचन आणि नैवेद्य दाखवावा.
या पवित्र महिन्यात मांसाहार, मद्यपान आणि इतर मादक पदार्थांचे सेवन करणे टाळावे.
मार्गशीर्ष महिन्यातील काही विशिष्ट तिथींना केस आणि नखे कापणे टाळावे.
घरी किंवा बाहेर कुणाशीही भांडण करणे, अपशब्द वापरणे किंवा अनादर करणे टाळावे.