Anuradha Vipat
मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार व्रताचे उद्यापन हे महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी केले जाते.
व्रताच्या नियमांनुसार मार्गशीर्ष महिन्यात एकूण जितके गुरुवार येतात त्या सर्वांचे व्रत करून शेवटच्या गुरुवारी योग्य विधीने उद्यापन करणे आवश्यक असते.
शेवटच्या गुरुवारी नेहमीप्रमाणे महालक्ष्मी देवीची पूजा आणि व्रत केले जाते.
पूजेनंतर देवीची कथा वाचावी, नैवेद्य दाखवावा आणि आरती करावी.
उद्यापनाच्या दिवशी किमान सात किंवा एका सुवासिनी महिलांना जेवणासाठी घरी बोलवावे.
हे व्रत पूर्ण महिनाभर चालणारे असल्याने शेवटच्या दिवशी व्रताची सांगता केल्याने देवी महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते
विधीपूर्वक उद्यापन केल्याने देवी महालक्ष्मी प्रसन्न होते आणि व्रताचे पूर्ण फळ मिळते.