Anuradha Vipat
१८ डिसेंबर २०२५ रोजी या वर्षातील शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार आहे.
शेवटचा गुरुवार हा उद्यापनाचा दिवस असल्याने या दिवशी काही विशेष नियम पाळणे महत्त्वाचे मानले जाते.
शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मीची व्रत कथा पूर्ण वाचणे किंवा ऐकणे अत्यंत आवश्यक आहे.
हा शेवटचा गुरुवार असल्याने या दिवशी व्रताचे उद्यापन करावे लागते.
शेवटच्या गुरुवारी देवीला विशेष नैवेद्य दाखवला जातो. शक्य असल्यास पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करावा.
या दिवशी पूर्णतः सात्त्विक आहार घ्यावा. घरात भांडणे किंवा वादविवाद टाळावेत.
शेवटच्या गुरुवारी गरजूंना अन्नदान किंवा धान्यदान करणे अत्यंत शुभ मानले जाते.