Anuradha Vipat
यंदा शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार उद्यापनाचा दिवस हा १८ डिसेंबर २०२५ रोजी आहे.
सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. महालक्ष्मीचा फोटो आणि कलश यांची मांडणी करावी.
देवीला हळद-कुंकू, अक्षता, फुले आणि सुगंधी धूप अर्पण करावा. महालक्ष्मी व्रताच्या पोथीचे मनोभावे वाचन करावे.
उद्यापनाच्या दिवशी किमान ५ किंवा ७ सुवासिनींना घरी बोलावावे. सुवासिनींना फळ किंवा सौभाग्य अलंकार आणि महालक्ष्मी व्रताची पोथी वाण म्हणून द्यावी.
देवीला नैवेद्य म्हणून खीर, पुरणपोळी किंवा सुग्रास अन्नाचा भोग अर्पण करावा.
दुसऱ्या दिवशी सकाळी कलश हलवावा. कलशातील पाणी तुळशीला अर्पण करावे आणि फुले विसर्जित करावीत.
उद्यापनाच्या दिवशी गरिबांना अन्नदान किंवा कपडे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते.