Healthy Foods : ३५ पेक्षा अधिक वयाच्या महिलांसाठी 'हे' पदार्थ आहेत सुपर फूड

Aslam Abdul Shanedivan

महिलांमध्ये समस्या

अनेक महिलांमध्ये वयाच्या ३५ शी नंतर सांधे दुखणे, पाठदुखी, पाय दुखणे आणि चिडचिड होणे यासारख्या समस्या अधिक जाणवतात.

Healthy Foods | Agrowon

हाडांचा कमकुवतपणा

प्रामुख्याने हाडांच्या कमकुवतपणाशी संबंधित अनेक लक्षणे जाणवतात. हाडे मजबूत करण्यासह आरोग्य सदृढ करण्याची चिंता महिलांना सतावत असते.

Healthy Foods | Agrowon

काही पदार्थांचे सेवन

तर महिलांनी ३५ शी नंतर काही पदार्थांचे सेवन केल्याने हाडे आणि स्नायू मजबूत होतात आणि अनेक आरोग्य विषयक समस्या दूर होतात.

Healthy Foods | Agrowon

पालक

हार्मोनल पातळीत बदल झाल्यामुळे किंवा शरीरातील लोहाच्या कमतरतेमुळे महिलांना अशक्तपणा येऊ शकतो. अशा वेळी पालक आणि हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केल्यास लोहाची कमतरता भरून निघते.

Healthy Foods | Agrowon

दही

प्रोबायोटिक्ससोबतच दह्यामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी आढळून येते ज्यामुळे हाडे मजबूत होतात. दह्यामुळे पचनशक्ती वाढते आणि शरीराला पोषक तत्वे शोषण्यास मदत होते.

Healthy Foods | Agrowon

एवोकॅडो

एवोकॅडो, निरोगी चरबीने समृद्ध असते. जे त्वचेसाठी देखील खूप चांगले मानले जाते. यामुळे महिलांना ३५ शी नंतर व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध एवोकॅडोचे सेवन करावे.

Healthy Foods | Agrowon

ब्रोकोली

कॅल्शियम आणि व्हिटॅमिन के हाडांसाठी अत्यंत आवश्यक घटक मानले जातात जे ब्रोकोलीमध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. ब्रोकोली हाडांची घनता वाढवते आणि कर्करोगासारख्या आजारांपासूनही संरक्षण देते. (अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या)

Healthy Foods | Agrowon

Curry Leaves Water : अपचन यांसारख्या अनेक समस्या अशा होतील गायब फक्त प्या, 'या' पानांच्या पाणी

आणखी पाहा