Aslam Abdul Shanedivan
पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पहिलेच पदक नेमबाजीत मिळाले असून मनू भाकरने पहिलं कांस्यपदक मिळवलं आहे.
मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक पटकावलं आहे.
भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक कांस्यपदक जिंकणारी मनू भाकर पहिली महिला नेमबाज ठरली आहे
तर पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत कोरियाच्या ओह ये जिन हिने सुवर्णवेध भेदत सुवर्णपदक पटकावलं आहे.
यानंतर आपल्याला याचा आनंद असून देशासाठी पदक जिंकू शकले. हे पदक सर्वांचे असल्याची पहिली प्रतिक्रिया मनू भाकर हिने दिली आहे
पॅरीस ऑलिम्पिकच्या आधी भगवद्गीता वाचली होती त्यातूनच प्रेरणा घेऊन पदक जिंकण्यात यशस्वी झाल्याची मनू भाकर म्हणाली.
मून भाकर ही मूळची हरियाणातल्या झज्जर तालुक्यातली असून ती २२ वर्षांची आहे. तर याआधी तिने जागतिक नेमबाजीत नऊ सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं जिंकली आहेत.