Aslam Abdul Shanedivan
पावसाळ्यात, ओलावा आणि घाणीमुळे अनेकदा घरात घोंगावणाऱ्या माशांचे प्रमाण वाढते. \
अशावेळी वेळीच माश्यांवर नियंत्रण न केल्यास अनेक संसर्गजन्य रोग घरात येऊ शकतात.
प्रत्येकांच्या घरात तुळस असतेच. तुळस औषधी गुणधर्मांची असल्याने माशा येण्याचे प्रमाण कमी होते.
कापूर आणि तमालपत्राचा वास इतका तीव्र असतो की माशा पळून जातात. यासाठी तमालपत्रात कापूर मिसळून तो जाळायचा. याच्या धूराने माशा निघून जातील
धार्मिक कार्यात उपयोगी पडणारा कापूर माशांवर एक रामबाण उपाय असून घराच्या चारही कोपऱ्यात एक–एक कापराची वडी ठेवल्याने माशा होत नाहीत.
काही नागरिक सायंकाळच्या वेळेस धूप पेटवतात. घरामध्ये धूप दाखवल्याने देखील माशा कमी होतात. तसेच पेटत्या धूपामध्ये कापराच्या वड्या टाकल्यास माशा निघून जातात.
मीठ आणि व्हिनेगर दोन्ही बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करतात. यामुळे मीठ आणि व्हिनेगर पाण्यात मिसळून घर स्वच्छ केल्यास घरातील माश्या येणार नाहीत