Anuradha Vipat
कुंडलीत मंगळ दोषअसल्यावर घाबरून न जाता योग्य ज्योतिषीय उपाय केल्यास या दोषाचा प्रभाव पूर्णपणे कमी करता येतो.
कुंडलीतील विशिष्ट स्थानांमुळे दोष निर्माण होतो ज्यामुळे विवाहात अडथळे किंवा वैवाहिक जीवनात तणाव येऊ शकतो.
मंगळ दोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी रोज किंवा दर मंगळवारी नियमितपणे हनुमान चालीसा किंवा बजरंग बाण यांचे पठण करावे.
दर मंगळवारी कडक किंवा एकभुक्त उपवास करावा. या दिवशी केवळ सात्त्विक अन्न किंवा फलाहार घ्यावा.
विवाहामध्ये अडचणी येत असल्यास लग्न ठरण्यापूर्वी 'कुंभ विवाह', 'विष्णु विवाह' किंवा 'अश्वत्थ विवाह'हा विधी केला जातो.
रोज किंवा दर मंगळवारी "ॐ क्रां क्रीं क्रौं सः भौमाय नमः" किंवा "ॐ अं अंगारकाय नमः" या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.
मंगळवारी गरजू व्यक्तींना लाल रंगाचे कपडे, मसूर डाळ, तांबे, गूळ किंवा बुंदीचे लाडू दान केल्याने मंगळ देव शांत होतात.