Magha Purnima Puja : माघ पौर्णिमेला भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केल्याने होतील आर्थिक अडचणी दूर, पाहा पद्धत

Anuradha Vipat

पूजा

माघ पौर्णिमेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्र पूजा केल्याने 'धन-धान्य' आणि 'सुख-समृद्धी' प्राप्त होते.

Magha Purnima Puja | agrowon

पूजेची तयारी

 सूर्योदयापूर्वी स्नान करून स्वच्छ पिवळे किंवा लाल वस्त्र परिधान करावे. चौरंगावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा.

Magha Purnima Puja | agrowon

संकल्प 

हातात अक्षता आणि पाणी घेऊन "आज मी माझ्या घरातील दारिद्र्य दूर करण्यासाठी आणि सुख-शांतीसाठी तुमची पूजा करत आहे," असा संकल्प करावा.

Magha Purnima Puja | agrowon

अभिषेक

मूर्तीला दूध आणि शुद्ध पाण्याने अभिषेक करावा.  विष्णूंना पिवळ्या चंदनाचा आणि लक्ष्मीला कुंकवाचा टिळा लावावा. पिवळी फुले आणि कमळ किंवा लाल गुलाबअर्पण करावा.

Magha Purnima Puja | agrowon

नैवेद्य

 दुधाची खीर किंवा पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. नैवेद्यात तुळशीचे पान नक्की ठेवावे.

Magha Purnima Puja | agrowon

जप

आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी पूजेदरम्यान ॐ नमो भगवते वासुदेवाय आणि  ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः मंत्रांचा किमान १०८ वेळा जप करावा

Magha Purnima Puja | agrowon

दिवा

तुपाचा दिवा लावून विष्णू आणि लक्ष्मीची आरती करावी. पूजा संपल्यानंतर सायंकाळी मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना दिवे लावावेत आणि तुळशीजवळही दिवा लावावा.

Magha Purnima Puja | agrowon

Magh Purnima 2026 : माघ पौर्णिमेला सुख समृद्धीसाठी करा 'हे' उपाय

Magh Purnima 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...