Animal Care : आला आला पावसाळा जनावरांना सांभाळा ; असं करा व्यवस्थापन

Mahesh Gaikwad

पशुपालन

भारतात मोठ्या प्रमाणात शेतकरी पशुपालनाचा व्यवसाय करतात. शेतील पूरक व्यवसाय म्हणून पशुपालनाकडे अनेक शेतकऱ्यांचा ओढा असतो.

Animal Care | Agrowon

दूध उत्पादन

पशुपालन व्यवसायामध्ये दूध उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात दुभत्या जनावरांचे संगोपन शेतकरी करतात.

Animal Care | Agrowon

मॉन्सून

सध्या देशात मॉन्सूनचा हंगाम सुरू झाला आहे. देशात सर्वदूर माॉन्सूनच्या पावसाचे आगमन झाले आहे.

Animal Care | Agrowon

जनावरांचे व्यवस्थापन

अशामध्ये पावसाळ्यात जनावरांच्या व्यवस्थापनाकडे अधिक लक्ष देणे गरजेचे असते. अन्यथा जनावरांना रोग आणि आजारांचा धोका होवू शकतो.

Animal Care | Agrowon

गोठा स्वच्छ ठेवावा

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जनावरांचा गोठा किंवा त्यांना बांधण्याची जागा स्वच्छ व कोरडी राहिल याची काळजी घ्यावी. याठिकाणी पाणी साठू देवू नये.

Animal Care | Agrowon

आहार व्यवस्थापन

याशिवाय पावसाळ्याच्या दिवसांत जनावरांच्या आहार व्यवस्थापनाकडेही योग्य लक्ष देणे गरजेचे असते. जनावरांना कोरडा आणि पौष्टीक चारा द्यावा.

Animal Care | Agrowon

पचनक्रिया मंदावते

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जनावरांची पचनक्रिया मंदावते आणि तसेच रोगप्रतिकारक शक्तीही कमी होते. या दिवसांत जनावरांना बाह्य आणि आंतरपरजीवींच्या संसर्गाचा धोका असतो.

Animal Care | Agrowon

प्रतिबंधात्मक लसीकरण

जनावरांना संसर्गापासून वाचविण्यासाठी पावळ्यात जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेणे अतिशय आवश्यक आहे.

Animal Care | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....