Mahesh Gaikwad
निरोगी आरोग्यासाठी सकस आहार महत्त्वाचा आहे. संतुलित आहार शरिराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे.
स्प्राऊट्स म्हणजेच मोड आलेली कडधान्ये ही आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत. मोड आलेली कडधान्यांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजांनी भरपूर असतात.
कडधान्ये कोणतेही असो पण ते जर मोड आलेले असेल, तर ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. मोड आलेले मूग खाणे हे तर आरोग्यासाठी बेस्ट आहे.
मोड आलेल्या मुगामध्ये भरपूर प्रमाणात तंतुमय घटक (फायबर) असतात. जे तुमचे पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात.
सकाळी एक वाटी मोड आलेले मूग खाल्ल्याने बध्दकोष्ठ, अपचन आणि पोटातील गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो.
याशिवाय मोड आलेले मूग खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही वाढण्यास मदत होते. तसेच यामध्ये असलेल्या लोहामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते.
मोड आलेल्या मुगामध्ये व्हिटामिन-ए असते, जे तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते. यामुळे डोळे निरोगी राहण्यास मदत होते.
एवढेच नाही, तर यातील ओमेगा-३ फॅटी अॅसिडमुळे गुड कोलेस्ट्रॉल वाढते आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते.