Desi Cow Management : गोठ्यातच तयार करा जातिवंत दुधाळ गायी

Team Agrowon

योग्य आरोग्य आणि प्रजनन व्यवस्थापन केल्यास जातिवंत देशी गोवंशाची दुधाळ पिढी आपल्या गोठ्यात तयार होते.

Desi Cow Management | Agrowon

प्रजनन व्यवस्थापन पशुपालक देशी गाय माजावर आल्यानंतर नैसर्गिक रेतनासाठी वापरात येणारा वळू हा उत्तम, जातिवंत वळू आहे का? त्या वळूच्या आईचे दूध उत्पादन किती होते? याची माहिती घेत नाही.

Desi Cow Management | Agrowon

गावातील उपलब्ध वळू हा बऱ्याचवेळा जातिवंत नसतो तसेच तो कमी दूध उत्पादनशील गाई-वळूपासून जन्मलेला असू शकतो.

Desi Cow Management | Agrowon

आपल्या देशी गाईची पुढची पिढी उत्पादनशील बनवण्यासाठी नैसर्गिक रेतनासाठी सिद्ध वळू असावा. आता सर्व ठिकाणी देशी गोवंशाच्या रेतमात्रा उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्या देशी गाईंमध्ये कृत्रिम रेतन करून पुढची पिढी उत्पादनशील तयार करता येते.

Desi Cow Management | Agrowon

गावातील नैसर्गिक रेतनासाठी वापरात येणाऱ्या वळूची कोणत्याही संसर्गजन्य आजाराची चाचणी केलेली नसते, त्यामुळे अशा वळूपासून गावातील देशी गाईंना रोगांचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असते.

Desi Cow Management | Agrowon

आपली गाय फक्त गाभण राहिली पाहिजे मग वासरू कसले का होईना हा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे. आरोग्य व्यवस्थापन देशी गाईची रोगप्रतिकारशक्ती उत्तम आहे. परंतु रोगप्रतिकारशक्ती आहार व्यवस्थापनावर अवलंबून असते हे लक्षात घ्यायला हवे.

Desi Cow Management | Agrowon

योग्य आहार व्यवस्थापनबरोबरच आपल्या देशी जनावरांचे संसर्गजन्य आजारापासून नियंत्रण करण्यासाठी जंतनिर्मूलन, लसीकरण आवश्यक आहे. गोठा स्वच्छता, गोठ्यासभोवतालचा परिसर स्वच्छ आणि कोरडा राहील याची काळजी घेणे आवश्यक आहे.

Desi Cow Management | Agrowon

Cotton Pest : कापसातील गुलाबी बोंडअळीला रोखण्याचे सोपे उपाय

आणखी पाहा...