Anuradha Vipat
अस्सल मालवणी चिकन थाळी ही महाराष्ट्रातील कोकणातील एक प्रसिद्ध डिश आहे.
अस्सल मालवणी चिकन थाळी केवळ चवदारच नाही तर पौष्टिकही आहे. आज आपण मालवणी चिकन थाळी कशी बनवायची याची सोपी रेसिपी पाहूया.
मालवणी मसाल्यांचा वापर करून बनवलेली चिकन करी अत्यंत चवदार असते.
चिकन, हळद, मीठ, हिरवं वाटण, सुकं वाटण, लिंबाचा रस
चिकनला हळद आणि मिठाने मॅरीनेट करा. सुकं खोबरं, सुकलेल्या लाल मिरच्या, मेथी दाणे, आले आणि लसूण यांचे मिश्रण एकत्र वाटून घ्या.
कांदा प्युरी करा. प्युरी केलेला कांदा तेलात परतून घ्या. त्यात वाटण घाला आणि मॅरीनेट केलेले चिकन घालून व्यवस्थित मिक्स करा आणि शिजवा
चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस घालून अस्सल मालवणी चिकन थाळीचा आस्वाद घ्या.