Makhana Farming : बिहारी शेतकऱ्यांनी वातावरण बदलास दिलेले चोख उत्तर म्हणजे मखाणा शेती

Team Agrowon

दरवर्षी अर्धे बिहार पुराच्या पाण्याखाली असते, तर अर्ध्या भागात दुष्काळ पाचवीला पुजलेला. येथे शेतीपेक्षाही दिसतात ती हजारो लहान-मोठी तळी, प्रचंड दलदल आणि वाहते पुराचे पाणी.

Makhana Farming | Agrowon

खरीप आणि रब्बीचे क्षेत्र अनेक वेळा कायम पाण्याखालीच असते. अनेक भागांमधील मका, भात, गहू शेती केव्हाच बंद झाली आहे. त्याची जागा ‘मखाना’ या पिकाने घेतली आहे.

Makhana Farming | Agrowon

पूर, दलदलीमुळे शेतामध्ये मोठमोठी तळी निर्माण होतात. या तळ्यात हे ‘फॉक्स नट’ म्हणजे काटेरी वॉटर लीलीचे उत्पन्न घेतले जाते.

Makhana Farming | Agrowon

पाण्यावर तरंगणारी मोठमोठी गोलाकार काटेरी पाने, निळसर फुले आणि याची फळे पाण्याखाली येतात. त्यामध्ये गोलाकार बिया असतात. या बियांपासून गोलाकार मोठ्या लाह्या म्हणजेच मखाणा केल्या जातात.

Makhana Farming | Agrowon

चीन, जपान, कोरियामध्ये मखाना मोठ्या प्रमाणावर पिकतो. पण जगामधील ९० टक्के मखाना उत्पादन बिहारमध्ये होते. तब्बल ८५ हजार हेक्टरवर आज याचे उत्पादन घेतले जाते.

Makhana Farming | Agrowon

भारतीय कृषी संशोधन परिषदेतर्फे बिहारसाठी मखानाचे खास सुधारित वाण उपलब्ध केले आहेत. बिहार शासनातर्फे शेतकऱ्यांना मखाना शेतीसाठी अनुदानही मिळते.

Makhana Farming | Agrowon

प्रति हेक्टरी अंदाजे एक लाख तीस हजार रुपये नफा मिळवून देणारे हे पीक म्हणजे बिहारी शेतकऱ्यांनी वातावरण बदलास दिलेले चोख उत्तर आहे.

Makhana Farming | Agrowon

उन्हाळ्यामध्ये मखाना उत्पादक शेतकऱ्याचे घर शेकडो पोती लाह्यांनी भरलेले असते. संपूर्ण कुटुंबाला रोजगार देणारी ही शेती आहे.

Makhana Farming | Agrowon