Anuradha Vipat
मेकअपच्या काही सोप्या टिप्सच्या मदतीने तुमचा लुक बदलता येतो आणि तुम्ही अधिक भारी दिसू शकता.
मेकअप करण्यापूर्वी चेहरा चांगल्या फेसवॉशने स्वच्छ धुवा. त्वचेच्या प्रकारानुसार मॉइश्चरायझर नक्की लावा.
फाउंडेशन लावण्यापूर्वी प्रायमर वापरा. यामुळे मेकअप जास्त काळ टिकतो
तुमच्या त्वचेच्या टोनशी मॅच होणारे फाउंडेशन निवडा. फाउंडेशन स्पंजने चेहऱ्यावर आणि मानेवर चांगले ब्लेंड करा.
तुमच्या कपड्यांना साजेशा आयशॅडो रंगांची निवड करा. डोळ्यांना हायलाइट करण्यासाठी काजळ किंवा आयलायनर वापरा. पापण्यांना मस्करा लावल्याने डोळे अधिक उठून दिसतात.
लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांना मॉइश्चराइझ करा. त्वचेच्या रंगानुसार लिपस्टिक लावा.
चेहऱ्याला हलके बल्श करा. यामुळे चेहरा फ्रेश दिसतो. मेकअप पूर्ण झाल्यावर सेटिंग स्प्रेने सेट करा