Anuradha Vipat
बाहेरून कोणतेही महागडे साहित्य न आणता, स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणाऱ्या मोजक्या वस्तूंचा वापर करून तुम्ही घरीच अतिशय मऊ आणि चवदार केक बनवू शकता.
अंडी, ओव्हन किंवा मैद्याचा वापर न करता कुकर किंवा कढईमध्ये झटपट स्पंज केक कसा तयार करावा, याची सर्वात सोपी रेसिपी खालीलप्रमाणे आहे.
बिस्किटे २ ते ३ पॅकेट पार्ले-जी, मारी गोल्ड, ओरिओ किंवा हायडिंग सीक - घरात जे उपलब्ध असेल ते, दूध, साखर, ईनो किंवा बेकिंग पावडर,तूप किंवा तेल.
बिस्किटे बारीक तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात साखर घालून एकदम बारीक पावडर करून घ्या. त्यात थोडे-थोडे कोमट दूध घालत चमच्याने एकाच दिशेने फिरवत मिक्स करा.
कुकर किंवा खोलगट कढईत तळाशी १ कप मीठ किंवा वाळू पसरा आणि त्यावर एक लहान स्टीलची वाटी किंवा स्टँड ठेवा.कुकरचे झाकण लावून मध्यम आचेवर १० मिनिटे गरम होऊ द्या.
ज्या भांड्यात केक बनवायचा आहे त्याला आतून सर्व बाजूंनी तूप किंवा तेल लावून घ्या. त्यावर थोडे सुके पीठ भुरभुरा. बिस्किटांच्या मिश्रणात १ चमचा 'ईनो' किंवा 'बेकिंग पावडर' टाका आणि त्यावर १ चमचा दूध टाकून ते हलक्या हाताने मिक्स करा. डबा कुकरमधील स्टँडवर काळजीपूर्वक ठेवा. कुकरचे झाकण बंद करा आणि मंद आचेवर ३० ते ३५ मिनिटे बेक होऊ द्या.
३५ मिनिटांनी केकच्या मध्यभागी सुरी किंवा टूथपिक घालून पाहा. जर सुरी स्वच्छ बाहेर आली, तर केक तयार आहे.