Home Composting : स्वयंपाकघरातील ओल्या कचऱ्याचे सोने करा! कुंड्यांमधील भाज्यांसाठी बनवा सर्वोत्तम कंपोस्ट खत

Anuradha Vipat

उत्तम पोषणद्रव्य

घरच्या ओल्या कचऱ्यापासून उत्पादित केलेले सेंद्रिय खत हे वनस्पतींसाठी उत्तम पोषणद्रव्य मानले जाते.

Home Composting | agrowon

साहित्य

उत्तम दर्जाचे खत तयार होण्यासाठी 'ओला कचरा' आणि 'सुका कचरा' यांचे योग्य मिश्रण आवश्यक असते.

Home Composting | agrowon

ओला कचरा

भाज्यांचे देठ, फळांची साले,वापरलेली चहाची पत्ती आणि कॉफी पावडर,शिळे अन्न (कमी प्रमाणात) आणि अंड्याची टरफले.

Home Composting | agrowon

सुका कचरा

सुकी पाने, झाडांच्या छोट्या वाळलेल्या फांद्या,बारीक केलेले सुके पुठ्ठे किंवा अंड्यांचे ट्रे, नारळाच्या शेंड्या आणि लाकडाचा भुसा.

Home Composting | agrowon

पद्धत

घरच्या घरी खत बनवण्यासाठी एक मोठी प्लास्टिकची बादली, कुंडी किंवा बाजारात मिळणारा रेडीमेड 'कंपोस्ट बिन' वापरा. या भांड्याच्या तळाशी आणि बाजूने हवा खेळती राहण्यासाठी ३-४ छोटी छिद्रे नक्की पाडा.

Home Composting | agrowon

पहिला थर

भांड्याच्या अगदी तळाशी २ इंच जाडीचा सुक्या पानांचा किंवा नारळाच्या शेंड्यांचा थर द्या. यामुळे भांड्यात हवा खेळती राहते आणि अतिरिक्त पाणी खाली वाहून जाण्यास मदत होते.

Home Composting | agrowon

कचरा टाकणे

आता बादलीत १ भाग ओला कचरा टाका आणि त्यावर लगेच २ भाग सुका कचरा (सुकी पाने किंवा पुठ्ठ्याचे तुकडे) टाका. कचऱ्याचे तुकडे जितके लहान असतील, तितके खत लवकर तयार होते.

Home Composting | agrowon

Home Gardening : बाल्कनी बनेल भाजीबाजार! घरच्या घरी कुंडीत सेंद्रिय भाजीपाला पिकवण्याची सोपी पद्धत

Home Gardening | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...