Home Gardening : बाल्कनी बनेल भाजीबाजार! घरच्या घरी कुंडीत सेंद्रिय भाजीपाला पिकवण्याची सोपी पद्धत

Anuradha Vipat

फायदेशीर छंद

घरी कुंडीत किंवा गच्चीवर स्वतःचा भाजीपाला उगवणे हा एक अतिशय सोपा, आनंददायी आणि आरोग्यासाठी फायदेशीर छंद आहे.

Home Gardening | agrowon

स्टेप्स आणि टिप्स

रासायनिक खते आणि जंतुनाशकांपासून मुक्त, ताजा भाजीपाला घरच्या घरी कसा उगवावा, याच्या सोप्या स्टेप्स आणि टिप्स खालीलप्रमाणे आहेत.

Home Gardening | agrowon

कोणती पिके निवडावीत?

गार्डनिंगची सुरुवात करताना नेहमी सोप्या आणि लवकर येणाऱ्या पिकांची निवड करावी. पालेभाज्या , मिरची, टोमॅटो, वांगी आणि भेंडी. वेलभाज्या कारली, दुधी भोपळा, तोंडली आणि दोडकी.

Home Gardening | agrowon

कुंडीची योग्य निवड

पालेभाज्यांसाठी जास्त खोल नसलेल्या, पण पसरट कुंड्या किंवा प्लास्टिक ट्रे, टोमॅटो, वांगी, मिरचीसाठी किमान १२ ते १४ इंचाची मोठी कुंडी किंवा ग्रो बॅग,वेलभाज्यांसाठी १८ ते २४ इंचाची मोठी कुंडी.

Home Gardening | agrowon

माती कशी तयार करावी?

फक्त साध्या मातीत झाडे नीट वाढत नाहीत. बागेतील किंवा शेतातील काळी/लाल माती, कोकोपीट , गांडूळ खत किंवा चांगले कुजलेले शेणखत.

Home Gardening | agrowon

सूर्यप्रकाश

भाजीपाल्याला चांगल्या वाढीसाठी रोज किमान ४ ते ६ तास थेट सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक आहे.

Home Gardening | agrowon

पाणी देणे

कुंडीतील माती वरून सुकलेली दिसल्यास पाणी द्यावे. उन्हाळ्यात रोज सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे. हिवाळ्यात दिवसाआड पाणी दिले तरी चालते.

Home Gardening | agrowon

Veggies To Avoid Night : रात्रीच्या जेवणात 'या' भाज्या खाणे आजच टाळा; अन्यथा रात्रीची झोप होईल खराब!

Veggies To Avoid Night | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...