Roshan Talape
तुम्हाला चमकदार आणि तजेलदार त्वचा हवी आहे का? घरीच सोप्या पद्धतीने नैसर्गिक व्हिटॅमिन C सीरम तयार करा आणि त्वचेला निरोगी चमक द्या!
संत्र्याच्या सालीमध्ये भरपूर नैसर्गिक व्हिटॅमिन C असते, जे त्वचेला उजळ, तजेलदार आणि ताजेतवाने ठेवण्यास मदत करते.
हे सीरम तयार करण्यासाठी संत्र्याच्या साल, गुलाबपाणी, एलोवेरा जेल आणि व्हिटॅमिन E कॅप्सूलचा वापर करावा.
संत्र्याच्या साली उन्हात वाळवून त्याची पावडर बनवा. त्यानंतर गुलाबपाण्यात एलोवेरा जेल आणि व्हिटॅमिन E कॅप्सूल मिसळा. हे मिश्रण एकत्र करून घरगुती सीरम तयार होईल.
तयार झालेला सीरम एका स्वच्छ काचेच्या बाटलीत थंड ठिकाणी ठेवावा. या सीरमचा वापर त्वचा उजळ, तजेलदार आणि ताजेतवाने ठेवण्यास मदत होते.
हा घरगुती तयार केलेला नैसर्गिक सीरम रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करून लावा आणि सकाळी ताज्या पाण्याने धुवा.
आठवडाभरातच त्वचेमध्ये तजेलपणा, मऊपणा आणि नैसर्गिक चमक जाणवेल! या सीरमच्या नियमित वापराने डाग कमी होण्यास मदत होईल.