Dragon Fruit Juice : उन्हाळ्यात घरीच बनवा ड्रॅगल फ्रूट सोडा

Mahesh Gaikwad

उन्हाच्या झळा

उन्हाच्या झळा जसजशा वाढत आहे, तसतसं घशाची कोरडही वाढत आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच अनेकांची पावले रसवंती गृहाकडे वळतात.

Dragon Fruit Juice | Agrowon

उन्हाळ्यातील आहार

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. या दिवसांमध्ये जास्त दाह निर्माण करणारा आहार घेतल्याने त्रास होतो.

Dragon Fruit Juice | Agrowon

ड्रॅगन फ्रूट

अशात तुम्ही उकाड्यापासून शरीराला थंड ठेवण्यासाठी घरच्या घरी थंड ड्रॅगन फ्रूटचा सोडा तयार करू शकता.

Dragon Fruit Juice | Agrowon

ड्रॅगन फ्रूट सोडा

यासाठी एक ड्रॅगन फ्रूटचे फळ, स्पार्कलिंग पाणी किंवा सोडा घ्या. एक चमचा मध, बर्फाचे तुकडे आणि पुदिन्याची पाने घ्या.

Dragon Fruit Juice | Agrowon

फळातील गर

आता ड्रॅगन फ्रूटच्या फळातील गर काढून ब्लेंडरमध्ये टाका. त्यात आता सोडा टाकत मिळसत राहा.

Dragon Fruit Juice | Agrowon

बर्फाचे तुकडे

एका ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे टाकून ब्लेंडरमधील मिश्रण गाळून घ्या. वरून थोडा सोडा घालून मध टाका.

Dragon Fruit Juice | Agrowon

पुदिन्याची पाने

आता ग्लास पूर्णपणे भरल्यानंतर वरून पुदिन्याच्या पानांची सजवाट (गार्निशिंग) करा.

Dragon Fruit Juice | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....