Anuradha Vipat
उपवासाच्या दिवसात तुम्हाला पौष्टिक आणि स्वादिष्ट अन्न खाणं गरजेचं आहे
चला तर मग आजच्या लेखात पाहूयात स्वादिष्ट आणि खमंग असा उपवासाचा पराठा कसा बनवायचा.
नवरात्रीसाठी उपवासाचे स्वादिष्ट पराठे बनवण्यासाठी साबुदाणा किंवा राजगिरा पीठ वापरावे
साबुदाणा किंवा राजगिरा पीठ, उकडलेले बटाटे, हिरवी मिरची, जिरे पूड, मीठ आणि शेंगदाणा कूट.
भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये किंवा राजगिऱ्याच्या पिठात उकडलेले बटाटे कुस्करून घ्या.
तयार केलेल्या मिश्रणात हिरवी मिरची, जिरे पूड, शेंदा नमक आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून मिश्रण एकत्र करा
मिश्रणाचे छोटे गोळे करून पराठ्याच्या आकारात थापा. गरम तव्यावर पराठा दोन्ही बाजूंनी तेल लावून खमंग होईपर्यंत भाजा.