Swarali Pawar
पावसामुळे भिजलेला कांदा साठवताना पटकन खराब होतो. योग्य काळजी घेतली तर मोठं नुकसान सहज टाळता येतं.
हा रोग जिवाणूंमुळे होतो आणि कांदा आतून मऊ पडतो. सडलेल्या कांद्याला वास येतो आणि पाणी सारखं द्रव बाहेर पडतं.
पावसात काढणी, जखमा आणि जास्त ओलावा यामुळे रोग वाढतो. उच्च तापमान आणि आर्द्रता हे जिवाणूंसाठी पोषक असतात.
कांद्याच्या आत तपकिरी द्रव तयार होऊन तो सडायला लागतो वरून चांगला दिसला तरी दाबल्यावर खराबपणा लक्षात येतो.
काढणीच्या १५-२० दिवस आधी पाणी देणं थांबवा. युरियाचा वापर कमी केल्याने कांदा मजबूत राहतो.
कांदा ७-१० दिवस चांगला वाळवा, त्यामुळे मान बंद होते. खराब किंवा मऊ कांदे वेगळे करून साठवण करा.
चाळीत हवा खेळती राहील अशी व्यवस्था असावी. सल्फर पावडर वापरल्यास सड कमी होण्यास मदत होते.
वेळीच उपाय केल्यास 40% पर्यंतचं नुकसान टाळता येतं. स्मार्ट व्यवस्थापनाने कांद्याची गुणवत्ता आणि उत्पादन टिकवा!