Anuradha Vipat
मकर संक्रांतीलातिळगूळ वाटण्यामागे अत्यंत महत्त्वाचे ज्योतिषीय आणि आध्यात्मिक कारण आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि शनी हे पिता-पुत्र आहेत, परंतु त्यांच्यात वैचारिक मतभेद आणि शत्रुत्व असल्याचे मानले जाते.
मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य आपल्या मुलाच्या म्हणजेच शनीच्या 'मकर' राशीत प्रवेश करतो.
सूर्य जेव्हा शनीच्या घरी जातो तेव्हा त्यांच्यातील जुने हेवेदावे विसरून ते एकत्र येतात.
समाजात आणि नातेसंबंधात असलेली कटुता संपवून स्नेहाचा गोडवा वाढावा यासाठी तिळगूळ वाटला जातो.
शनीच्या राशीत सूर्याचे संक्रमण होत असताना तिळाचे सेवन आणि दान केल्याने कुंडलीतील शनीचे दोष कमी होतात
ज्योतिषीय कारणासोबतच शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तिळगूळ खाणे आणि वाटणे लाभदायक ठरते.