Anuradha Vipat
मकर संक्रांतीला सुवासिनींनी सुगडे पुजण्याचा आणि ओवसण्याचा मुख्य काळ हा बुधवार, १४ जानेवारी २०२६ रोजी आहे.
पंचांगानुसार आणि धार्मिक मान्यतेनुसार संक्रांतीच्या दिवशी पुण्यकाळात ओवसणे अत्यंत शुभ मानले जाते.
१४ जानेवारी २०२६ सकाळी ०७:१७ ते सायंकाळी ०५:५४ पर्यंत संक्रांत पुण्यकाळ आहे.
सकाळी ०७:१७ ते सकाळी ०९:०४ पर्यंत हा काळ सुगडे पुजण्यासाठी आणि दानासाठी अत्यंत श्रेष्ठ आहे.
सकाळी १० वाजेपूर्वी सुगडे पुजून ओवसणे सर्वोत्तम मानले जाते जेणेकरून त्यानंतर तुम्ही हळदी-कुंकवाचे वाण देऊ शकता.
सुगडामध्ये नवीन धान्य , ऊस, बोरं, तीळ, गूळ आणि गाजर यांसारख्या वस्तू भरून ती देवासमोर किंवा तुळशीसमोर ओवसावीत.
ओवसताना सुवासिनींनी पूर्वेकडे तोंड करून पूजा करावी.