Anuradha Vipat
मकर संक्रांतीच्या दिवशी काही गोष्टी करणे आवश्यक आहे तर काही गोष्टी टाळणे हिताचे ठरते.
संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी अंगाला तिळाचे उटणे लावून स्नान करावे.
'तीळगूळ घ्या, गोड बोला' म्हणत एकमेकांना तिळाचे लाडू द्यावेत, ज्यामुळे नात्यातील कटुता दूर होते.
या दिवशी गाईला हिरवा चारा किंवा गूळ-पोळी खाऊ घालणे अतिशय शुभ मानले जाते.
संक्रांतीच्या दिवशी मांसाहार, अंडी किंवा कांदा-लसूण युक्त पदार्थ खाणे टाळावे. सात्विक आहार घ्यावा.
मद्यपान किंवा कोणत्याही प्रकारचे व्यसन या पवित्र दिवशी करू नये.
संक्रांतीच्या दिवशी झाडे कापणे किंवा पाने तोडणे अशुभ मानले जाते.