Anuradha Vipat
वजन कमी केल्यानंतर ते पुन्हा वाढू नये म्हणून खालील ५ सवयी आयुष्यभरासाठी पाळणे अत्यंत गरजेचे आहे.
प्रथिने घेतल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते, स्नायूंची वाढ होते आणि सारखी भूक लागत नाही.
वजन कमी झाले म्हणजे व्यायाम थांबवू नका. दिवसातून किमान ३०-४० मिनिटे चालणे किंवा आठवड्यातून किमान ३ दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग करा.
मैद्याचे पदार्थ, सोडा, मिठाई आणि पॅकेज्ड फूड पुन्हा खायला सुरुवात करू नका.
दिवसाला ७-८ तास शांत झोप घ्या. झोप पूर्ण न झाल्यास शरीरात 'घ्रेलीन' (भूक वाढवणारे संप्रेरक) वाढते.
जेवणापूर्वी अर्धा तास पाणी पिण्याने भूक कमी लागते.
आठवड्यातून एकदा 'चीट मील' ठीक आहे, पण दररोज नाही.