Grassy Shoot Disease: उसात गवतासारखी वाढ दिसतेय? गवताळ वाढ रोगाची ही प्रमुख लक्षणे

Swarali Pawar

उसात गवतासारखी वाढ?

कधी कधी ऊसाच्या बेटात अचानक खूप फुटवे दिसतात. हीच समस्या म्हणजे ऊसातील गवताळ वाढ होय.

Grassy Shoot Disease | Agrowon

गवताळ वाढ रोग?

हा रोग फायटोप्लाझ्मा नावाच्या सूक्ष्मजंतूमुळे होतो. तो मुख्यतः बेणे आणि किडींमुळे उसात पसरतो.

Grassy Shoot Disease | Agrowon

कोणत्या जातींमध्ये?

को ४१९, को ८६०३२, कोएम ०२६५ यांसारख्या काही जातींमध्ये हा रोग जास्त दिसतो. म्हणून अशा जातींच्या लागवडीत विशेष काळजी घ्यावी.

Grassy Shoot Disease | Agrowon

रोगाचा प्रसार

दूषित बेणे वापरल्यास रोग झपाट्याने पसरतो. मावा आणि तुडतुडे या किडींमुळेही रोग एका बेटातून दुसऱ्यात जातो.

Grassy Shoot Disease | Agrowon

सुरुवातीची लक्षणे

उसाच्या बेटात खूप जास्त फुटवे दिसू लागतात. काही वेळा एका बेटात १०० पेक्षा जास्त फुटवे दिसतात.

Grassy Shoot Disease | Agrowon

पानांमध्ये होणारे बदल

उसाच्या पानांमध्ये हरितद्रव्य कमी होते. म्हणून पाने पिवळी किंवा पांढरी पडू लागतात.

Grassy Shoot Disease | Agrowon

पुढील अवस्थेतील लक्षणे

रोग वाढल्यास कांड्यावरील डोळ्यांतून पिवळसर पांगशा फुटतात. नंतर ऊस पोकळ पडतो आणि हळूहळू वाळू लागतो.

Grassy Shoot Disease | Agrowon

परिणाम

गवताळ वाढ झाल्यास गाळण्यालायक ऊस तयार होत नाही. यामुळे ऊस उत्पादनात साधारण ५ ते २० टक्के घट होऊ शकते.

Grassy Shoot Disease | Agrowon

Bael Juice Benefits: उन्हाळ्यात बेलफळाचं सरबत का प्यावा? शरीराला थंडावा देणारे नैसर्गिक पेय

अधिक माहितीसाठी...