Anuradha Vipat
महाशिवरात्रीला शिवलिंगावर काही विशिष्ट वस्तू अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते.
महादेवाला बेलपत्र अत्यंत प्रिय आहे. 'त्रिदल' बेलपत्र अर्पण केल्याने पापांचा नाश होतो असे मानले जाते.
दही ,मध आणि दुधाने अभिषेक केल्याने आरोग्य लाभते.
शिवपूजेत पांढऱ्या फुलांना विशेष महत्त्व आहे. तुम्ही धोतरा, कन्हेर किंवा मोगऱ्याची फुले अर्पण करावीत.
शिवलिंगावर अक्षता अर्पण करताना ते अखंड असावेत म्हणजे तुटलेले नसावेत.
महादेवाला भस्म प्रिय आहे. कपाळावर आणि शिवलिंगावर भस्म किंवा पांढऱ्या चंदनाचा टिळा लावल्याने मानसिक शांती मिळते.
धोतऱ्याचे फळ आणि फुले अर्पण केल्याने नकारात्मकता दूर होते