Anuradha Vipat
आजारपण आणि शारीरिक व्याधींपासून मुक्ती मिळवण्यासाठी महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो.
भगवान शिव हे 'मृत्युंजय' (मृत्यूवर विजय मिळवणारे) आणि 'वैद्यनाथ' (देवांचे डॉक्टर) आहेत.
सर्व प्रकारच्या गंभीर आजारांतून मुक्त होण्यासाठी आणि अकाली मृत्यूची भीती टाळण्यासाठी हा मंत्र सर्वोत्तम आहे
"ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥" महाशिवरात्रीला रुद्राक्षाच्या माळेने किमान १०८ वेळा या मंत्राचा जप करावा.
शक्य असल्यास समोर तांब्याच्या कलशात पाणी ठेवून जप करावा आणि नंतर ते 'तीर्थ' म्हणून प्राशन करावे
जर तुम्हाला मोठा मंत्र म्हणणे कठीण जात असेल, तर "ॐ जूं स: माम् पालय पालय स: जूं ॐ" या लहान मंत्राचा जपही तितकाच फलदायी ठरतो
ज्यांना सतत अशक्तपणा किंवा जुनाट आजार आहेत, त्यांनी भगवान शिवाला मध अर्पण करावे