Anuradha Vipat
माघ पौर्णिमेचा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो.
घरात सुख-समृद्धी आणि शांतता टिकवून ठेवण्यासाठी या दिवशी तुम्ही खालील उपाय करू शकता.
या दिवशी घरात भगवान सत्यनारायणाची पूजा करणे अत्यंत फलदायी ठरते.
सकाळी लवकर उठून पवित्र नदीत स्नान करावे. यामुळे शरीर आणि मन शुद्ध होते.
संध्याकाळी माता लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावावा आणि 'कनकधारा स्तोत्र' किंवा 'लक्ष्मी अष्टक' चे पठण करावे.
माघ पौर्णिमेला तुळशीला जल अर्पण करून दिवा लावावा.
या दिवशी केलेले दान ३२ पटीने पुण्य देते. त्यामुळे गरजू लोकांना अन्न, तीळ, गूळ, तूप किंवा वस्त्र दान करावे.